अतिवादी नव्हे शुद्ध या – संत तुकाराम अभंग – 93

अतिवादी नव्हे शुद्ध या – संत तुकाराम अभंग – 93


अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ।
ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण ।
श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न ।
तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

अर्थ
प्रपंच्यामधे कारणाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बिजाचा नाही तो अत्यंज आहे असे संत सांगतात, तो विद्वान ब्रम्हण असला तरी त्याला अंत्यज पुराण समजावे .वेद, श्रुती यांना जो प्रमाण मानत नाहीत नाही, श्रेष्ठांनचे वचन जो मानित नाही .तुकाराम महाराज म्हणतात अश्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


अतिवादी नव्हे शुद्ध या – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.