मागतां विभाग – संत तुकाराम अभंग – 920

मागतां विभाग – संत तुकाराम अभंग – 920


मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥
होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥

अर्थ
हे देवा आम्ही जर आमचा वाटा आमची मागणी तुम्हास मागावयास आलो तर तुम्ही कोठे लपून बसला?आमचा तुमच्या कडे वाटा आहे हे संत या वाचनाचे साक्ष आहेत.मग मी तुझ्या दारात धरणे धरून बसेल व तुला बाहेर जाऊ देणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण मी अक्षर रूप आहे व तुझ्या माथ्यावर देव पणाचा भार आहे त्यामुळे तुला माझ्या विनंतीचा विचार करावा लागेल व माझ्या विनंती पुढे तुझे काहीही चालणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

भक्तिसुख नाहीं आले – संत तुकाराम अभंग – 919

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.