दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी – संत तुकाराम अभंग – 92

दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी – संत तुकाराम अभंग – 92


दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी ।
देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन ।
करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ ।
वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी ।
पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग ।
बोलिलासे त्याग देश त्याचा ॥४॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक ।
अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥

अर्थ
दुर्जनंचा सहवास हा विष्टेप्रमाने दुर्गंधीयुक्त असतो तेव्हा सज्जनाने त्या पासून दूर राहावे .हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अश्या दुर्जनंचि संगत तुम्ही करू नका . दुर्जनांचे अंग अखंड विटाळलेले असते व त्याची वाणी विटाळशी स्त्रीच्या स्रवलेल्या द्रव्या प्रमाणे आहे .हे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असतात ज्या प्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्या चे भय बाळगुन आपण त्या पासुन दुर पळतो त्या प्रमाणे दुर्जना पासुन दुर पळावे .दुर्जनंचि संगती करू नये, त्यांचा त्याग करावा; एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाहि त्याग करावा, असे श्यास्त्र सांगते .तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हांला किती सांगु हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.