घेऊनियां चक्र गदा – संत तुकाराम अभंग – 90
घेऊनियां चक्र गदा ।
हाचि धंदा करीतो ॥१॥
भक्ता राखे पायापासीं ।
दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥
अव्यक्त तें आकारलें ।
रूपा आलें गुणवंत ॥२॥
तुका म्हणे पुरवी इच्छा ।
जया तैसा विठ्ठल ॥३॥
अर्थ
हातामधे चक्र, गदा घेऊन देव सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो .भक्तांचे रक्षण करुण त्यांना आपल्या पायजवर स्थान देतो; पण दुष्टांचा मात्र नाश करतो .भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातुन व्यक्त रुपात येतो .तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
घेऊनियां चक्र गदा – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.