जेविले ते संत मागें उष्टावळी – संत तुकाराम अभंग – 9

जेविले ते संत मागें उष्टावळी – संत तुकाराम अभंग – 9


जेविले ते संत मागें उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा ।
पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें ।
हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत ।
जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका ।
मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड ।
पुरविलें कोड नारायणें ॥५॥

अर्थ
संतसज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे .मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे .ब्रम्हरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी संगावयाचे कारण नाही; कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे .आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्येक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे .मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे.म्हणुन कोणीहि मनामधे शंका धरु नये .तुकाराम महाराज म्हणतात की, प्रत्यक्ष भगवंतनेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


जेविले ते संत मागें उष्टावळी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.