क्षर अक्षर हे तुमचे विभाग – संत तुकाराम अभंग – 894
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥
तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥
प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका म्हणे तुम्हां नाना अवगुणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
अर्थ
हे देवा क्षर आणि अक्षर म्हणजे जीव आणि माया हे तुमचेच विभाग आहेत मग तुम्ही जगाला आपल्या पासून भिन्न का ठेवता?असे जरी असले तरी आमचा जीव भाव तुम्ही स्वीकारा व आमच्या वस्तुस्थित आम्ही बदल होऊ देणार नाही पाप आणि पुण्य हे प्रतिपादन तुमचेच आहे आणि हा तुझाच खेळ आहे.असे असून जीवाला जन्म मरणाच्या फेर्यात का ठेवले हे?तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही नाना प्रकारचे सोंग घेऊन तुम्ही खोट्याचे खरे भास्विता म्हणजे मिथ्या असलेले खरे भासवीता
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
क्षर अक्षर हे तुमचे विभाग – संत तुकाराम अभंग – 894
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.