तीर्थी धोंडा पाणी – संत तुकाराम अभंग – 89
तीर्थी धोंडा पाणी ।
देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग ।
समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे ।
येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप ।
गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
अर्थ
सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते; पण तुकाराम महाराजांना संतसज्जनांमधे देव दिसतो .अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा .तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही जर मनामधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात .तुकाराम महाराज म्हणतात, संतसज्जनांमधे राहून कि एकदा पाप गेले मग जीवनातील त्रिविध ताप नाहिसे ज़ाले हे माहित होते .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तीर्थी धोंडा पाणी – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.