पुराणींचा इतिहास – संत तुकाराम अभंग – 888
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करिल झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥
अर्थ
पुराणातील इतिहासाचा गोड रस मी ग्रहण सेवन केलेला आहे.म्हणून मी जे बोल बोलतो ते इतरांच्या काव्य प्रमाणे वाया जात नाही.म्हणून मी जे बोल बोलतो आहे त्या मधील तुम्हीअर्थ लक्षात घेऊन पंढरीला अवश्य जा.अहो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हला मनुष्य देह मिळाला आहे म्हणून या विठ्ठलाचे दर्शन घ्या.त्यामुळे तुमच्या पाप पुण्याचा झाडा होऊन ते नष्ट होईल आणि तुमच्या जन्म मरणाची पीडाच टळेल.हातात टाळविना घेऊन या विठ्ठलाचे गुणगान गावे.तुकाराम महाराज म्हणतात असे केल्याने तुम्हाला घट पट व इतर मार्ग शोधावे लागणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पुराणींचा इतिहास – संत तुकाराम अभंग – 888
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.