वेळोवेळां हेचि सांगें – संत तुकाराम अभंग – 886

वेळोवेळां हेचि सांगें – संत तुकाराम अभंग – 886


वेळोवेळां हेचि सांगें । दान मागें जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगतीसी ॥ध्रु.॥
वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥
तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥

अर्थ

मी जगासी हेच दान मागत आहे व जगाणे तसेच वागावे की,श्री विठ्ठलाचे चिंतन सर्वांनी करावे या पांडुरंगाचे चिंतन करणे हे मंगल आहे संतांच्या पंगतीस बसून आपण विठ्ठल नाम भोजन सेवन करू क्षणा क्षणाला आपले आयुष्य सरत आहे त्या करता आपण हरी भजना साठी ओढ घेतली पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात जर हरी भजना विषयी आलास केला तर तुम्ही फुकट फसाल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वेळोवेळां हेचि सांगें – संत तुकाराम अभंग – 884

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.