रुची रुची घेऊं गोडी – संत तुकाराम अभंग – 885

रुची रुची घेऊं गोडी – संत तुकाराम अभंग – 885


रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥
काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतू विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥
करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥

अर्थ

हे देवा तुझ्या जवळ जे आम्हाला प्रेमसुख लाभले आहे आता आम्ही ते प्रेम सुख आनंदाने घेऊ.आम्ही एक क्षण देखील वाया जाऊ देणार नाही कायम त्या विठोबाच्या पायचे चिंतन करू.हरीनाम रुपी भजन आणि भोजन करून आम्ही तृप्त होऊ.हे विठ्ठला तुझ्याच चिंतनाने जीव समाधान पावतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

रुची रुची घेऊं गोडी – संत तुकाराम अभंग – 884

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.