पंढरीचा महिमा – संत तुकाराम अभंग – 88

पंढरीचा महिमा – संत तुकाराम अभंग – 88


पंढरीचा महिमा ।
देतां आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाहीं कोठें ।
देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
आहेति सकळ ।
तीर्थे काळें देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ ।
भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

अर्थ
पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे .या सारखे ठिकाण दुसरे कोठेही नाही करण येथे भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे .इतर क्षेत्र बर्‍याच कालानंतर फळ देणारी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची बाजार पेठ व भुमीवरिल वैकुंठच आहे


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


पंढरीचा महिमा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.