उपकारी असे आरोनी उरला – संत तुकाराम अभंग – 879
उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥
लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥
जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळचि रासि गुणांचीच ॥२॥
तुका म्हणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
अर्थ
जो दुसर्यावर उपकार करण्यासठी सदैव तत्पर असतो त्याच्या ठिकाणी दुजा भाव नसतो.ज्यात परोपकार आहे असे काम संपन्न करण्यात त्याला मोठा लाभ वाट असतो अश्यावेळी त्याला किती श्रम करावे लागतात याचा तोविचार हि करत नाही व परवा हि करत नाही.असा हा मनुष्य इतरांच्या जीवाची काळजी घेतो व हा मनुष्य म्हणजे फक्त सद्गुनांचीच खाण असते.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे आपल्या हृदयात ज्याने परोपकाराचे धैर्य जपलेले असते त्या भक्तांचा देव अंकित झालेला असतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
उपकारी असे आरोनी उरला – संत तुकाराम अभंग – 879
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.