जातिविजातीची व्हावयासि – संत तुकाराम अभंग – 873
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मीलें तें ॥ध्रु.॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाई । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥
अर्थ
एका जातीची दुसऱ्या भिन्न जातीशी भेट करून देऊ नये उदारणार्थ कासाय ची गाईशी वाघाची गाईशी कधीही भेट करून देऊ नये.जे होणार आहे ते होणाऱ्याच्या गुणा नुसार होऊ द्या नारायणाने निर्मिले आहे तसे होईल.वाघाला जर भूक लागली असेल म्हणून त्याला गाय द्यावी याचे नाव पुण्य आहे काय?तुकाराम महाराज म्हणतात जो मनुष्य विचार न करता काहीही कृत्य करतो त्याचे माता पिता हे गाढवेच म्हणावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जातिविजातीची व्हावयासि – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.