नको सांडूं अन्न नको – संत तुकाराम अभंग – 870
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥
मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥
नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥
अर्थ
हरी प्राप्ती साठी अन्न त्याग करवा असे काही नाही तसेच वनात जाऊन राहावे असेही काही नाही सर्व कर्म करत असतांना नारायणाचे स्मरण करावे.बाळ ज्या वेळी आईच्या खांद्यावर बसते त्यावेळी त्याला चालण्याचा त्रास होत नाही कारण आईच्या प्रेमाशी तो एकरूप झालेला असतो त्या प्रमाणे नारायणाचे नारायाणाशी ऐक्य पळून आपले कर्तव्य करावे.जे जे कर्म करशील तू त्याचा त्याग कर.तुकाराम महाराज म्हणतात हाच एक परमार्थ श्रेष्ठ मार्ग आहे या पेक्षा वेगळा उपदेशच नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नको सांडूं अन्न नको – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.