न करीं रे संग राहें रे निश्चळ – संत तुकाराम अभंग – 87
न करीं रे संग राहें रे निश्चळ ।
लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान ।
अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय ।
संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा ।
अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥
अर्थ
तू कोणाचाही संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- मोहाचा मळ लागू देऊ नको .अशी मनाची निसं:ग अवस्थालाच अव्दैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान हेच होय, बाकी सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बडबड आहे .इंद्रियांचे दमन करूण त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, कोणत्याही प्रकारचा संकल्प मना मध्ये येऊ देऊ नको .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तीच्याअंतकरणा मधुन अहंकार नाहिसा होतो आणि आनंदि आनंद निर्माण होतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
न करीं रे संग राहें रे निश्चळ – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.