नव्हे ब्रम्हचर्य बाइलेंच्या – संत तुकाराम अभंग – 869
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेंच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडारे तें धीरें आचावाच ॥ध्रु.॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मुळ स्तुति होतां ॥३॥
अर्थ
काहीतरी कारणास्तव पत्नीचा त्याग केला किंवा भीती पोटी देशाचा त्याग केला तर त्याला वैराग्य प्राप्त होत नाही.वासनेच्या वासनेच्या लहरीमुळे काम आणि भय वाढते त्यामुळे त्याचा दृढ निश्चयाने त्याग करावा.जो शूरत्वाच्या गप्पा मारतो आणि युद्धाच्या गोष्टी एकूण घाबरतो त्याची युद्धाच्या काळात फजिती होते.तुकाराम महाराज म्हणतात जो खोट्या वैराग्याच्या गोष्ठी करतो त्याची स्तिती आपण करू नये कारण आपली जीभ वितळते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेंच्या – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.