मरणाहातीं सुटली काया – संत तुकाराम अभंग – 868
मरणाहातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥
नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥
न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥
तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
अर्थ
अहंम ब्रम्हास्मि या महा वाक्याचा मला बोध झाला त्यामुळे माझा जीव जन्म मरणाच्या चक्रातून सुटला आहे.त्यामुळे माझी सर्व प्रकारची तळमळ नष्ट झाली आहे व मी ब्रम्ह पदाचा आंनद भोगत आहे.ब्रम्ह पदाचा आंनद घेतल्यामुळे हे मी ब्रम्ह आहे हे वर्म हाती लागल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास मला दिसत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता कोणत्याही प्रकारचे मागणे शिल्लक राहिले नाही कारण जीव हा शिव रूप झाला आहे.यांची जाणीव मला झाली आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मरणाहातीं सुटली काया – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.