योग्याची संपदा त्याग – संत तुकाराम अभंग – 867
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभय लोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥
येर येरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडा वेसीं ॥ध्रु.॥
केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
योग्याची संपदा त्याग – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.