कौतुकाची सृष्टी – संत तुकाराम अभंग – 864
कौतुकाची सृष्टी । कौतुकेचि केलें कष्टी ॥१॥
मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥
जाणणियासाटी। भय सामावले पोटी ॥२॥
तुका म्हणे चेता । होणें तें तूच आयता ॥३॥
अर्थ
या सृष्टीची निर्मिती माये पासून झाली आहे.व या मायेच्या कवतुकाने जीव कष्टी होतो.हा मायेचा खेळ दृढ निश्चयाने मोडला तर मोडतो.अहंकारामुळे द्वैत भाव निर्माण होऊन त्यामुळेच भय निर्माण होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्या आत्म जागृतीच्या स्थितीत तुला यायचे आहे ती स्थिती तुझ्या ठिकाणी आहे तूच ब्रम्ह आहे तूच चेता आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कौतुकाची सृष्टी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.