भाग्यवंतां हेचि काम – संत तुकाराम अभंग – 862

भाग्यवंतां हेचि काम – संत तुकाराम अभंग – 862


भाग्यवंतां हेचि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
पिकलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥

अर्थ

भाग्यवंत लोकांना आपल्या वैखरीने आपल्या वाणीने हरीनाम उच्चारणे हरीनाम रुपी माप मोजत बसने ऐवढेच काम असते.त्यांच्या अंगी आंनदाची पुष्टी असते आणि त्यांच्या संगतीत असणारे श्रोते त्यांच्यामुळे यांचाही उद्धार होतो.ज्याने धन्य पिकविले तो किती खाणार आहे?खरा फायदा तर त्याच्या पंगतीत बसलेल्या लोकांचा.तुकाराम महाराज म्हणतात अश्या महंतांना माझा साष्टांग नमस्कार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

भाग्यवंतां हेचि काम – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.