मुळाचिया मुळें – संत तुकाराम अभंग – 861
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका म्हणे थीतें । दुःख पाववावें चित्ते ॥३॥
अर्थ
योग मार्गात अनेक वर चढ पायऱ्या असतात त्यात श्रम जास्त असतात असा योग मार्गाचा धर्म आहे मग तो योग मार्ग श्रम वाढविणारा नाही काय?कोणती वेळ कशी येते हे आसक्तीच्या भरात समजत नाही.व नको त्या भानगडीत गुंतण्याचा प्रसंग येतो. तुकाराम महाराज म्हणतात या योग मार्गात चित्ताला मात्र दुःख भोगावे लागते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मुळाचिया मुळें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.