लेकराची आळी न पुरवावी – संत तुकाराम अभंग – 858

लेकराची आळी न पुरवावी – संत तुकाराम अभंग – 858


लेकराची आळी न पुरवावी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥
आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥ध्रु.॥
वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरविलें ॥२॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हे ॥३॥

अर्थ

विठाबाई माऊली लेकराचा हट्ट का पूर्ण करत नाही?तिच्या पाशी काय उणे आहे?या विठाईच्या भक्तांना ब्रम्हज्ञान किंवा आत्मस्थिती भाव आवडत नाही.विठाई हि पतितांना पावन करणारी आहे याचा अनुभव मी घेणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझा हा भोळे पणाचा प्रयत्न आहे पण याचे खरे कवतुक मी तुम्हांला शेवटी दाखवीन.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

लेकराची आळी न पुरवावी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.