संतापाशीं बहु असावें – संत तुकाराम अभंग – 853
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥
बासर तो भुंके गाढवाचेपरी । उठे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥
समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥
तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणीची ॥३॥
अर्थ
संतांपाशी असताना मर्यादा धरून वागावे,जर आपण वाईट पणाने वागलो तर आपला घात होण्याचि संभावना असते.वाईट बोलणारा माणूस हा भुंकणारा गाढवच आहे.म्हणून त्याच्या पाठीवर मार खाल्लेले वळ उठत असतात.वेळ समय न समजणाऱ्या व्यक्तीला चहाटळ व मूर्ख म्हणावे त्यास ओंगळ हि पदवी प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात अश्या या मूर्ख माणसांचे बोलणे व ते मनुष्य हे घाण हगवणी सारखे आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संतापाशीं बहु असावें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.