एक करिती गुरु गुरु – संत तुकाराम अभंग – 850

एक करिती गुरु गुरु – संत तुकाराम अभंग – 850


एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥२॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥

अर्थ

असी कित्येक लोक आहेत कि जे आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करतात व स्वतःला गुरु गुरु असे म्हन्विण्यात धन्यता मानतात अश्या या खोटे पणाने भरलेल्या माणसांना मनुष्य न मानता शेपूट नसलेले चार पायाचे कुत्रे समजावे.असेहे कुत्रे परस्त्री गमन मद्य पान खाणे पसंद करतात.तुकाराम महाराज म्हणतात या अश्या माणसांना आपण पुढे अधोगतीला जाणर आहोत यांची काळजी वाटत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

एक करिती गुरु गुरु – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.