थोडें आहे थोडें आहे – संत तुकाराम अभंग – 85

थोडें आहे थोडें आहे – संत तुकाराम अभंग – 85


थोडें आहे थोडें आहे ।
चित्त साह्य जालिया ॥१॥
हर्षामर्ष पाहीं अंगीं ।
पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥
अवघ्या साधनांचें सार ।
न लगे फार शोधावें ॥२॥
तुका म्हणे लटिकें पाहें ।
सांडीं देह अभिमान ॥३॥

अर्थ
भक्तिमार्गाची वाटचाल करतांना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे .हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना सामान भासतात, तेच भक्तीचे अधिकारी होतात .सर्व भक्तीमार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधवे लागत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे, हे ओळखून अहंकार, देहसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


थोडें आहे थोडें आहे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.