नाहीं मागितला – संत तुकाराम अभंग – 843

नाहीं मागितला – संत तुकाराम अभंग – 843


नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥
नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवाणांत ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला मी तुमच्याकडे काही मान मागितला नव्हता.असे असूनदेखील मला लोकांकाडून सन्मान मिळतो आहे तो देऊन माझी तुम्ही फजिती का करतात?माझे पोट भरत नाही म्हणून मी तुमच्या नावाचा बोभाटा कधीही या जनमानसात केलेला नाही.तुकाराम महाराज म्हणतात असे असूनदेखील मी कधीही तुमचा हात धरून संतांच्या कचेरीत मी तुम्हाला कधी नेले नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नाहीं मागितला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.