आम्ही जाणों तुझा भाव – संत तुकाराम अभंग – 841
आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥
बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥
तुका म्हणे आतां । नेघो सर्वस्व ही देतां ॥३॥
अर्थ
देवा आम्हाला तुझा फसविण्याचा हेतू माहीत आहेत त्यामुळे आम्ही तुझे पाय घट्ट धरलेले आहे.देवातू आम्हाला काहीतरी उगाच थोडेफार देऊन आमची एक चुकवाचूक करू लागला तर आम्ही तुला हालू देणार नाही.हे हरी आम्ही तुझी सेवा फार दिवसापासून करत आहोत आता त्या कर्जाचे लिगाड फार जड झालेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात तू ते कर्ज फेडण्या करण्याकरिता आम्हाला सर्वस्व दिले सर्व काही जरी दिले तरी ते आम्ही घेणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्ही जाणों तुझा भाव – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.