याचि हाका तुझे द्वारीं – संत तुकाराम अभंग – 840

याचि हाका तुझे द्वारीं – संत तुकाराम अभंग – 840


याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी ॥१॥
सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥
सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥
एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या द्वारा मध्ये ऋण करी भक्त आरोळ्या देत असतात आणि तू त्यांना आषाढी वारीला या कार्तिकी वारीला या असे सांगतो असा तो लंड म्हणजे लबाड आहे.कोणी भक्त तुझ्याकडे त्याची इच्छित वस्तू मागण्यास आला तर त्याला तू भोग रूप जेवणात गुंतवितो आणि स्वतः माया रूप आवरणात लपून बसतोस.तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे तू तुझ्या भक्तांना काहीतरी देऊन त्यांचीसमजूत काढतो आणि त्यांना वाटे लावतो असा तू ठक आहेस म्हणजे लबाड आहेस.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

याचि हाका तुझे द्वारीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.