विरोधाचें मज न साहे – संत तुकाराम अभंग – 838

विरोधाचें मज न साहे – संत तुकाराम अभंग – 838


विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥

अर्थ

परमार्थाच्या विरोधामध्ये कोणीही काहीही बोलले मला ते बोलणे सहन होत नाही ते शब्द ऐकून माझे मन कासावीस होते.या कारणामुळे मला कोणाचीही संगती आवडत नाही मला एकांतच गोड वाटतो.मला देहाची भावना वासनेचा संग हे काहीही आवडत नाहीत मला त्याचा अगदी कंटाळा आलेला आहे.तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे देह मोहजाळात अडकतो आणि देव आपल्यापासून अंतरतो व आपल्याला दुःख वाढते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

विरोधाचें मज न साहे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.