आलें फळ तेव्हां राहिलें – संत तुकाराम अभंग – 837

आलें फळ तेव्हां राहिलें – संत तुकाराम अभंग – 837


आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥
नामेचि सिद्धी नामेचि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥
तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥

अर्थ

एखाद्या वृक्षाला फळ आले आणि ते देठाला चिटकून राहिले तर ते चांगल्या प्रकारे पीकेल.नामाने सर्व काही सिद्ध होते पण दुसरीकडे कोठेही मन जाऊ देऊ नये.तुला ज्या मार्गाने मुक्कामाला जेथे जायचे असेल तेथे जाण्यासाठी तू त्या मार्गाने चालला आहे त्या मार्गाने चालत राहा जरी तुला काही प्रतिबंध होत असेल तरीही तू त्या मार्गाने चालत रहा म्हणजे मुक्कामाला पोहोचशील.तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मार्गांमध्ये अडचण येत असतात कोणत्याही प्रकारचा लाभ आणि याचा विचार करू नये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आलें फळ तेव्हां राहिलें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.