देहभाव आम्ही राहिलों – संत तुकाराम अभंग – 836

देहभाव आम्ही राहिलों – संत तुकाराम अभंग – 836


देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥
म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥
जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥
तुका म्हणे जालों जयाचा अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥४॥

अर्थ

आम्ही विठोबाचे चरणी देहभाव अर्पण केलेला आहे त्यामुळे आम्ही निवांत राहिलो आहोत.आमच्या हिताचा उपाय देवच जाणत आहे ते पुढचेही देवच करत आहे.हे वचन आम्ही संतांचे मुखातून ऐकलेले आहे त्यामुळे सुखदुःख मी जाणत नाही.मी माझा सर्व भार त्या विठ्ठलावर घालूनच निसंग निवांत एकटा राहिलो आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी ज्याचा सर्वभावे सेवक झालेलो आहे तोच माझे सर्व हित जाणत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

देहभाव आम्ही राहिलों – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.