पुसावेंसें हेचि वाटे – संत तुकाराम अभंग – 831

पुसावेंसें हेचि वाटे – संत तुकाराम अभंग – 831


पुसावेंसें हेचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥
अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥२॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥३॥

अर्थ

मला जे जे कोणी भेटेल त्यांना मला एवढेच विचारवेसे वाटते की देव माझ्यावर कृपा करील काय तो माझी लाज राखिल काय आता मला साऱ्या गोष्टींचा विसर पडला असून एवढा एकच उदयोग मला लागला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मला एवढीच एक चिंता लागली आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा असा मला कोणी भेटेल का?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पुसावेंसें हेचि वाटे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.