जेणें घडे नारायणीं अंतराय ।
होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा ।
करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु ।
राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय ।
आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
अर्थ
नारायणाचि भक्ती करतांना प्रत्यक्ष जन्मदाते बाप माय जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे .पत्नी, पुत्र, धन यांनाही पमार्थापासून दूर ठेवावे, परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रु आहेत . प्रल्हादाने आपल्या माता पित्यांचा, बिभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वधर्म हरिच्या पायाशी असतांना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचें मूळ आहेत .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.