सत्य सत्य देततो फळ – संत तुकाराम अभंग – 827

सत्य सत्य देततो फळ – संत तुकाराम अभंग – 827


सत्य सत्य देततो फळ । नाहीं लागतचि बळ ॥१॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥
करावीच चिंता । नाहीं लागत तत्वतां ॥२॥
तुका म्हणे भावें । होते सकळ बरवें ॥३॥

अर्थ

सत्य हेच सत्याने फळ देत असते.त्यसाठी इतर बळाची जरुरी लागत नाही.देवाच्या चरणाचे स्मरण हे धैर्‍याने करावे हाच सर्वोत्तम उपाय आहे.मग कोणत्याही प्रकारची चिंता करवी लागत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरण जवळ श्रद्धा ठेवली कि सर्व चांगलेच होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

सत्य सत्य देततो फळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.