नये इच्छूं सेवा स्वइच्छा – संत तुकाराम अभंग – 826
नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥
देहाच्या निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥
तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडो ॥३॥
अर्थ
जगातील लोकांची सेवा करावी हि इच्छा धरू नये कारण त्या मुळे आपले देवाकडे लक्ष लागत नाही.या देहाचा सांभाळ हा तोच करत असतो,जर हा देह त्याच्या स्वाधीन केला तर कोणतीही कटकट आपल्यावर येत नाही.स्वतःच्या इच्छेने आई पुत्राची सेवा करत असते,परंतु तिचा हा मोठे पण तिला बाधक होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात वरवरचे दिमाखदार वागणे सोडून द्या कारण मोडसीचे दुखणे झाले तर दुन्गांचे स्नायू फाटतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नये इच्छूं सेवा स्वइच्छा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.