नामाची आवडी तोचि – संत तुकाराम अभंग – 820
नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह कांहीं मनीं ॥१॥
ऐसें मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥
नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलो नये ॥२॥
तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥
अर्थ
ज्याला देवाचे नाव आवडते,तोही देव आहे असे समजा.याविषयी मनामध्ये काही संशय धरू नका.हि माझी मूर्खपणा बडबड नाही.संतांचेही असेच मत आहे.जो हरीनाम घेतो,त्याला इतर साधने करण्याची आवश्यकता आहेअसे समजू नये कारण ते एकच साधन पुरेसे आहे.मी जे काही म्हणतो,ते माझे बोलणे त्यानांच गोड वाटेल कि,जे शुद्ध वंशात जन्माला आले आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नामाची आवडी तोचि – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.