संत तुकाराम अभंग

व्याल्याविण करी शोभनतांतडी – संत तुकाराम अभंग – 82

व्याल्याविण करी शोभनतांतडी – संत  तुकाराम अभंग – 82


व्याल्याविण करी शोभनतांतडी ।
चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी ।
सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥
कुंथाच्या ढेंकरें न देवेल पुष्टी ।
रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका ।
अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥

अर्थ
एक मुर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते .इतर प्रसुत झालेल्या स्त्रीयांच्या क्रीया पाहुन तिही प्रसुतीचे चाळे करते, तसे साखरेची गोडी सांगुण कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो .त्याचप्रमाने न जेवताच ढेकर देणाराहि जेवनाने तृप्त झाल्याचा देखावा करुन स्वत:लाच कष्टि करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, त्याचे नाटक करता येत नाही, आणि तसे केले असता फजीतीच होते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


व्याल्याविण करी शोभनतांतडी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *