नाहीं संतपण मिळत – संत तुकाराम अभंग – 819

नाहीं संतपण मिळत – संत तुकाराम अभंग – 819


नाहीं संतपण मिळत ते हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाहीं तरी गोष्टी सांगो नये ॥३॥

अर्थ

संतपणा बाजारात विकत मिळत नाही,किंवा रानात,वनात,गीरीकापाटात हिंडण्याने मिळत नाही संतपणा कितीही मोठी किंमत दिली ,पैसा ओतली तरी मिळत नाही.तो आकाशात किंवा पाताळात कोठेही मिळत नाही.हरीला आपला जीव अर्पण करण्यातच संतपणा मिळत असतोअशी स्थिती जर नसेल,तर संतपणाची गोष्ठच काढू नये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नाहीं संतपण मिळत – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.