नका घालूं दुध जयामध्यें – संत तुकाराम अभंग – 816
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥
अर्थ
तुम्हाला दुध (त्या मध्ये सर्व सार आहे) असे दुध नसेल द्यायचे तर नका देऊ ,पण निदान ताक देऊन तरी थोडे उपकार करा.अहो अन्न नसेल देत तर नका देऊ पण निदान पाणी तरी पाजा.तुकाराम महाराज म्हणतात मला या सगुण रुपाची चाड म्हणजेच आवड आहे,तरी मला कोणी तरी त्या हरीचे दर्शन घडवा एवढे कोणी तरी माझी दुर्बळाची इच्छा पूर्ण करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नका घालूं दुध जयामध्यें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.