सोनियांचा कळस – संत तुकाराम अभंग – 812
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥
अर्थ
हे संत जनहो जर सोन्याच्या पत्रात दारू भरली तर ते सोन्याचे पात्र कितीहि चांगले असले तरी त्या सोन्याच्या पत्राला काही किंमत आहे का?.त्या प्रमाणे मातीच्या मडक्यात अमृताचा साठा केला तर त्या अमृताला मडक्यामुळे काही दोष लागेल का किंवा ते अमृत अपवित्र होईल का?तुकाराम महाराज म्हणतात आता माझे हित ज्याच्या मध्ये आहे ते कृपा करून लवकरात लवकर हे संत जनहो तुम्ही मला सांगा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सोनियांचा कळस – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.