हो का पुत्र पत्नी बंधु – संत तुकाराम अभंग – 81

हो का पुत्र पत्नी बंधु – संत तुकाराम अभंग – 81


हो का पुत्र पत्नी बंधु ।
त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळों आलें खट्याळसें ।
शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥
फोडावें मडकें ।
मेलें लेखीं घायें एकें ॥२॥
तुका म्हणे त्यागें ।
विण चुकी जे ना भोगें ॥३॥

अर्थ
परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तो संबंध तोडून टाकावा .या नातेवाईकांना आपल्यापासून दूर केले असता त्यांचा दोष आपल्याला लागत नाही .एखाद्या मनुष्या मृत्यु झाला म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडले जाते, त्याप्रमाणे सार्‍या नातेवाइकांचा संबंध तोडूंन टाकावा .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


हो का पुत्र पत्नी बंधु – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.