पुढें आतां कैंचा जन्म – संत तुकाराम अभंग – 805
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
अर्थ
आता या पुढे संसार रुपी जन्म मृत्यूचे निवारण होण्यासाठी मनुष्याचा या पुढे जन्म कसा मिळेल?त्यामुळे मानव जन्म आपणास लाभला आहे व अशी सोय असताना इतर कुठेही फिरू नये पांडुरंगा सारखी नाव आपल्याला भक्ती भावाने या भावसागरातून तारणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबांनो तुम्हाला पुढे प्राप्त होणार्या जन्म-मृत्यूच्या सर्व खेपा चुकतील फक्त तुम्ही एकनिष्ठ भक्तिभावाने पांडुरंगाची भक्ती करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पुढें आतां कैंचा जन्म – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.