यथार्थवाद सांडूनि उपचार – संत तुकाराम अभंग – 803

यथार्थवाद सांडूनि उपचार – संत तुकाराम अभंग – 803


यथार्थवाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥

अर्थ

यथार्थवाद सोडून म्हणजे जे खरे आहे ते सोडून समोरच्याला जे आवडेल ते बोलून त्यांना खुश करणे किंवा खुश करण्याचा प्रयत्न जो करतो तो नरकात जातो.जर एखाद्या चोराला पकडले आणि त्याला चोरी कोणी करायला सांगितली त्याचे नाव त्यांने सांगितले तर दोघांच्याही हात पायात बेड्या पडतात.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व म्हणजे मी जे काही सांगत आहे त्या सर्व गोष्टी पुराणात सांगितलेल्या आहे व तेच निर्णय मी सांगत आहे, माझे बोलणे काही वायफळ नव्हे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

यथार्थवाद सांडूनि उपचार – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.