आतां माझा सर्वभावें – संत तुकाराम अभंग – 801

आतां माझा सर्वभावें – संत तुकाराम अभंग – 801


आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न रीं विचार आणिकांसी ॥१॥
सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥

अर्थ

आता पूर्ण पणे मी निर्धार केला आहे,मी कोणाचाही विचार करणार नाही फक्त तुझे नाम मी प्रेमाने व आवडीने गाईन हरीचे चरण हेच माझे ध्येय आहे.तुझ्या अंगणात मी लोटांगण घालीन आणि तुझे मुख डोळे भरून पाहीन.निर्लज्ज होऊन मी तुझ्या अंगणात नाचेल, मनात कुठल्याही प्रकारची शंका धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझा दास आहे तुझी आज्ञा पाळणारा सेवक आहे हाच संकल्प माझ्या मानत नांदत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आतां माझा सर्वभावें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.