मानावया जग व्हावी – संत तुकाराम अभंग – 800

मानावया जग व्हावी – संत तुकाराम अभंग – 800


मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं हे माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उशीर आतां देवा ॥२॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥

अर्थ

मला समाजात मन सम्मान मिळावा माझ्याकडे द्रव्य असावे असे मला वाटत नाही याचि मला इच्छा हि नाही.तुझ्या पायासाठी तर मी सर्व अराणुक(आपेक्षांना शांत) केली आहे.आता मला दुसरे काही नको.आता तू माझ्यावर कृपा कर व माझा अंगीकार कर उशीर लावू नकोस.तुझ्या शिवाय दुसरे काही खरे नाही हे मला कळले आहे म्हणून माझी वासना आवरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधे आता माझे मनोरथ तूच पूर्ण करा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मानावया जग व्हावी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.