जेवितांही धरी – संत तुकाराम अभंग – 80

जेवितांही धरी – संत  तुकाराम अभंग – 80


जेवितांही धरी ।
नाक हागतियेपरी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा ।
आपुलीच अवकळा ॥ध्रु.॥
सांडावें मांडावें ।
काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥
तुका म्हणे करी ।
ताक दुधा एकसरी ॥३॥

अर्थ
काही मुर्ख माणसे प्रात:विधीवेळी(शौच्याच्या वेळेस) वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतनाही लावतात .कोणत्या वेळी काय करावे, काय करू नाही याचे ज्ञान त्यांना नसते .त्यामुळे ते आपलिच फजीति करुण घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


जेवितांही धरी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.