मान अपमान गोवे – संत तुकाराम अभंग – 84

मान अपमान गोवे – संत तुकाराम अभंग – 84


मान अपमान गोवे ।
अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हेंचि देवाचें दर्शन ।
सदा राहे समाधान ॥ध्रु.॥
शांतीची वसती ।
तेथें खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे ।
तुका म्हणे थोडें आहे ॥३॥

अर्थ
परमार्थमार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान, अभिमान गुंधळून ठेवावे .चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे .जेथे शांति असते तेथे काळही थांबतो .तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच्यातील सर्व कामविकारांच्या उर्मि शांतपणे सहन करणे म्हणजे परमार्थमार्गाची वाटचाल करणे होय.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


मान अपमान गोवे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.