काय कीर्ती करूं लोक – संत तुकाराम अभंग – 799

काय कीर्ती करूं लोक – संत तुकाराम अभंग – 799


काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होईल थोरपणें जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । त्या मज विपत्ती गोड देवा ॥४॥

अर्थ

मान सम्मान कीर्ती व लौकिक याचे काय करावे?मला तू तुझे चरण दाखव.देवा मी तुझा दास आहे मी वाया जाईन असे काही तू करू नकोस मला ज्ञानाचा भार देवून थोर पण येईल. असे झाले तर मी तुझ्या चरणापासून दूर जाईल.माझ्या अंतरीचा भाव हा लोकांना काय कळणार? तुकाराम महाराज म्हणतात मला साधू समजून एक पाया पडतो व ते पाहून दुसरा पण माझ्या पाया पडतो ज्या योगाने तुझे पाय मला सापडतील असे तू कर मग मी दरिद्री राहिलो तरी चालेले.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय कीर्ती करूं लोक – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.