अंतरीचा भाव जाणोनिया – संत तुकाराम अभंग – 797

अंतरीचा भाव जाणोनिया – संत तुकाराम अभंग – 797


अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरविली आशा । पंढरी निवासा मायबापा ॥२॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥

अर्थ

माझ्या अंतरीचा गुजभाव या पांडुरंगाने जाणला व तशी कृती केली.आम्ही जे शब्द तुझी स्तुती करण्यासाठी वापरले ते खाली पडले नाही तू आम्हा अनाथांची माऊली आहेस.हे पंढरीनाथा मायबापा माझ्या याचकाची तू अशा पुरविली.माझ्या मनात जी भेदाची शंका होती तू तिचा नाश केला आहेस.तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या कृपेने तू मला निर्भय केले आहेस आता मी तुझे अपार गुणगान गात राहील.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

अंतरीचा भाव जाणोनिया – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.