कलिधर्म मागें सांगितले – संत तुकाराम अभंग – 795
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
तेंचि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥
अर्थ
कलयुगामध्ये भ्रष्ट ब्राम्हण आपला आचार विचार टाकतील असे पूर्वी संतानी सांगितले आहे.त्याचीच प्रचीती आता येत आहे सर्वानीच अधर्माचा आश्रय घेतला आहे.शास्त्रात सांगितलेली तप,साधना,तपश्चर्या ,व्रते करण्यात खूप कष्ट पडतात म्हणून हे लोक आपला देह पाळतात.आपणच स्वतः देव आहे असे समजून देवळात जात नाहीत,मग ते संसारा वेगळे का राहत नाही?तुकाराम महाराज म्हणतात मी जर यांची परवा करून गप गुमान राहिलो तर ते योग्य नाही कारण हे प्राणी नरकात जातील.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कलिधर्म मागें सांगितले – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.